पिरनवाडी येथील क्रांतिवीर संगोळी रायण्णा पुतळ्याबाबत गुरुवारी नेते मंडळी आणि अधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली आहे.
यासंबंधी एक पूर्वतयारी बैठक शासकीय विश्रामधमात पार पडली. बैठकीला जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ,पोलीस आयुक्त त्यागराजन यांच्यासह वरिष्ठ महसूल अधिकारी,पोलीस अधिकारी उपस्थित होते.बैठकीत जारकीहोळी यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली.
पिरनवाडी बाबत विविध संघटना आणि समाज प्रमुखांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
चाहत्यांनी सुचविलेल्या जागेवर रायण्णांचा पुतळा बसवू : मुख्यमंत्री
पिरनवाडी येथील संगोळी रायण्णांचा पुतळा हटविण्याच्या वादावरून आज निरंजनंद श्री यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांच्या गृहकार्यालयात भेट घेतली. यावेळी पिरनवाडी येथे चाहत्यांनी सुचविलेल्या जागेवर पुतळ्याची उभारणी करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
पुतळा हटविण्यावरून सुरु झालेला वाद सुलभरितीने आणि समन्वयाने सोडविण्यासाठी शिष्टमंडळ काम करत आहे. तसेच बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनीही अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन याप्रश्नी तोडगा काढण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
या बैठकीवेळी गृहमंत्री बसवराज बोम्मई तसेच निरंजनंद श्री यांच्यासमवेत अनेक कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते.