मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रामलिंगवाडी गोवावेस येथील नागरिक चंद्रकांत बाबुराव बिर्जे यांच्या घराची भिंत कोसळून सुमारे 1 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसामुळे रामलिंगवाडी, गोवावेस येथील नागरिक चंद्रकांत बाबुराव बिर्जे यांच्या मालकीच्या घराची एका बाजूची भिंत काल बुधवारी मध्यरात्री कोसळली. सदर घर 80 ते 90 वर्षे जुने आहे.
या घरात चंद्रकांत बिर्जे व बंडू बिर्जे हे बिर्जे बंधू आपल्या कुटुंबासमवेत एकत्र राहत होते. घर जीर्ण झालेले असल्यामुळे अलीकडेच महिन्याभरापासून संभाव्य धोका लक्षात घेऊन बिर्जे कुटुंबीय आपल्या नव्या घरात राहत होते.
त्यामुळे बुधवारी मध्यरात्री भिंत कोसळली त्यावेळी सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
तथापि भिंत कोसळल्यामुळे बिर्जे कुटुंबीयांचे जवळपास 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे हे नुकसान झाले असल्यामुळे शासनाने बिर्जे कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
काल बुधवारी देखील शहरातील बसवणं गल्ल्लीतील घरांची भिंत कोसळली होती कारचे नुकसान झले होते ग्रामीण भागात देखील अनेक घरांची पडझड झाली आहे सरकारने या घराच्या भिंती कोसलेल्याना नुकसान भरपाई देण्याची गरज आहे