Friday, January 24, 2025

/

टिनायटस्-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

टिनायटस् हा एक लॅटीन शब्द असून त्याचा अर्थ गुंजन किंवा घणघण येणे असा आहे. हा आजार नसून अनेक आजारांचे ते एक लक्षण आहे. अंतर्गत कानामध्ये आवाजाचे भान येणे किंवा बाहेर आवाज नसताना कानामध्ये घुँई असा आवाज सातत्याने ऐकू येणे याला टिनायटस म्हणतात. हा आवाज एखाद्या मोटरसारखा, वार्‍यासारखा, गिरणीसाराखा असू शकतो. एकतर असा आवाज फक्त रूग्णालाच ऐकू येत असल्याामुळे त्यांची क्षमता किंवा पातळी मोजता येणे अशक्य असते. त्यामुळे फक्त रूग्णाने सांगण्यावरच विश्‍वास ठेवावा लागतो.

कारण- अति कर्कश आवाज अवचित कानावर पडणे. कानठळ्या बसवणारा आवाज उदा. स्फोट, उच्च तरंग लहरीचे संगीत इ. ऐकण्यामुळे टिनायटसचा त्रास सुरू होऊ शकतो.
सतत कान फुटणे, कानाचे क्रॉनिक इन्फेक्शन इ. मुळे.
कानात काही वस्तू उडकून पडणे.

कानात वॅक्स (मळ) साठणे.
झोपेची औषधे अचानक थांबवण्याने चेहर्‍याच्या काही नसा लुळ्या पडल्याने.
वयाप्रमाणे ऐकू येण्याची क्षमता कमी होण्याबरोबरच टिनायटसचा विकार बळावू शकतो.
काही वेळा रक्तवाहिन्यांच्या स्पंदनांमुळे कानात आवाज जाणवू शकतो.

जायंट सेल आर्टेंरायटिस किंवा व्हॅस्कुयलायटीस नावाच्या रक्तवाहिन्यांच्या विकारांमध्ये तसेच कॅरोटिड आर्टरी अन्युरिझम नावाच्या विकारांमध्ये कानात हृदयाच्या ठोक्याबरोबरच स्पंदने जाणवू शकतात.
मिनीअर्स डिसीज नावाच्या कानाच्या आवाजाला कारणीभूत विकारामध्ये चक्कर येणे, आवाज येणे (टिनायटस) व ऐकू कमी येणे अशी लक्षणत्रयी आढळून येते. या विकाराला जुनाट सायनस विकार कारणीभूत ठरू शकतो.
औषधांमुळे टिनायटस होऊ शकतो.

उदा. जटामायसीन, क्लोरांमफिनीकोल, इरीथ्रोमायसीन, टेट्रासायक्लीन, टोब्रामायसीन, बँकोमायसीन, डॉक्सीसायक्लीन या अँटीबायोटिक्समुळे टिनायटस होऊ शकतो.
www.drsonalisarnobat.com
शिवाय ब्लिओमायसीन व इंटरफेरॉन या कर्करोग व प्रतिविषाणू औषधांमुळे टिनायटस जाणव शकतो. डाययुरेटिक्स मुळेही त्रास होतो.

डोक्याला मार लागणे, स्क्लिरोसीस, थायरॉईड डिसीज, हायपरलिपीडेमिया (कोलेस्टेरॉल व ट्रायलिसराईड वाढल्यामुळे) व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स कमतरता आयर्न (लोह) कमी असणे, डिप्रेशन (नैराश्य) अतिकाळजी इ. मुळे टिनीटस जाणवू शकतो.
लक्षणे- अर्थातच कानात आवाज येणे, डोके सुन्न होणे, ऐकू कमी येणे व डोळे दुखणे, बेचैनी होणे तर सहजच आहे. रूग्ण या विकाराला अक्षरशः वैतागून जातो.
उपचार- हा फक्त आजार नसून अनेक आजारांचे लक्षण आहे. हा विकार इतका सामान्य आहे की दर तीस रूग्णांमागे एका रूग्णाला असावाच पण तीव्रता मात्र अत्यल्प किंवा प्रचंड या मध्ये कितीही असू शकते. मूळ आजार बरा करणे शक्य असल्यास टिनायटसही कमी होतो. फक्त होमिओपॅथिमध्येच या विकारावर बरेच विस्तृत लेखन व उपचारासंबंधित प्रयोग झाले आहेत. अनेक प्रकारचे टिनायटस होमिओपॅथिक उपचारांनी बरे झाले आहेत. परंतु उपचार कालावधी मात्र जास्त असतो.
Dr Sonali Sarnobat
9916106896
9964946918

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.