Sunday, December 1, 2024

/

श्रवणशक्ती-वाचा डॉ सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

कर्ण“ कान हा आपल्या ज्ञानेंद्रियांपैकी एक! कानामुळे ऐकू येते. शरीराचा तोल सांभाळला जातो. कानाचे तीन भाग असतात बाह्य, मध्य व अंतर्गत, बाह्य कान हा कानाची पाळी व पडद्यापर्यंतच्या भागाइतकाच असतो. मध्य कानात तीन वाहक हाडांचे जोउ व शरीराचा तोल सांभाळणारी वेटोळी नलिका नलिका असते. अंतर्गत कानांमध्ये श्रवण चेतनवाहिनी व तोल सांभाळण्याचे संदेश नेणारी वाहिनी अशी रचना असते. ह्या भागांमध्ये बिघाड उत्पन्न झाल्यास ऐकू येण्याचे कमी होते.
श्रवणदोषाची विभागणी तीन प्रकारात केलेली आहे.
वाहक दोष- बाह्य किंवा मध्य कानात काही अडथळे असल्यामुळे कमी ऐकू येणे. उदा. कानात मळ साठला असल्यास, कानात इन्फेक्शन होऊन पाणी साठल्यास, मध्य कानातील हाडांना इजा होऊन अथवा या हाडांची झीज झाल्यामुळे या प्रकारचा श्रवणदोष उत्पन्न होतो. शक्यतो उपचारांमुळे रूग्णाला पूर्ववत ऐकू येते. परंतु हाडांची अपरिमित झीज (स्क्लिरोसिस) झाली असल्यास ऐकू येणे कठीण असते.

संदेशवाहक- पेशी दोष- श्रवण संदेश मेंदूपर्यंत पोचवणार्‍या कानातील विशिष्ट पेशींचा र्‍हास झाल्यास श्रवणक्षमतेत बिघाड होतो. कानाला काही इजा झाल्यास अथवा वृध्दत्वामुळे या पेशीचा र्‍हास होतो.
चेननसंस्था दोष- श्रवण संदेश पेशींनी जरी व्यवस्थित कायम ग्रहण केला तरी नर्व्हज्मध्ये बिघाड झाल्यास श्रवणसंदेश कानापासून मेंदूपर्यंत पोहोचवला जाऊ शकत नाही व ऐकू येत नाही.

www.drsonalisarnobat.com
रूग्ण ऐकू न येण्याची तक्रार घेऊन आल्यास त्याची ऑडिओमेट्री नावाची टेस्ट करावी लागते. त्याव्दारे श्रवणदोघांचे अचूक निदान होत. त्यानंतर श्रवणदोषांच्या कारणाप्रमाणे उपचार ठरवले जातात.
’अपेक्षा’ आठ ते नऊ वर्षाची अगदी गोड चुणचुणीत मुलगी. हुशार असल्याने शाळेत सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. बक्षिसं मिळवायची. शिवाय अभ्यासातही अव्वल! अलीकडे तिचं काहीतरी बिनसलं होत खास! कोणत्याही स्पर्धेची तयारी नाही, धडपड नाही. अभ्यास नको. काही नको! एकलकोंड्यासारखं बसायचं. खाण्यात लक्ष नाही. बोलण्यात लक्ष नाही. तिची आई तिला दाखवायला घेऊन आली. अपेक्षाला तपासताना एकच प्रश्‍न दोन दोनदा विचारावा लागत होता. अपेक्षाची आई म्हणाली की हे असंच चाललंय. धुंदीत असल्यासाराखीच करते. तिला तपासून झाल्यावर कदाचित तिला ऐकू कमी येत असावे, अशी शंका आली. ऑडिओमेट्री टेस्ट करून शेतल्यावर ती खरी ठरली. अपेक्षाला कमी ऐकू येत होते. कायम सदी व कफामुळे कान व घसा यांना जोडणारी युस्टेशियन ट्यूब पुरती बंद होऊन अपेक्षाची श्रवणशक्ती 80 टक्के कमी झाली होती. हा तिच्या आईवडिलांना मोठा धक्का होता. सर्दी व कफामुळे कानामध्ये अतिरिक्त दाबामुळे वाहक दोष उत्पन्न होऊन ऐकू येणे कमी झाले होते. यावर अपेक्षाला होमिओपॅथिक औषधेे दिल्यामुळे सर्दी व कफ तर कमी झालाच शिवाय व्यवस्थित ऐकूसुध्दा येऊ लागले. यात जवळजवळ वर्षाचा कालावधी गेला.

वयानुसार येणारा बहिरेपणा, अति थंडीमुळे कान बंद होणे, कानांच्या अंतर्गत हाडांची झीज होणे यावर उत्कृष्ट होमिओपॅथिक उपचार आहेत. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक असते.
9916106896
9964946918

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.