कोरोना महामारीचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे तालुक्यात याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. आता तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. नुकतीच नंदिहळळी येथे एक कोरोना रुग्ण आढळला आहे त्यामुळे या भागात सीलडाऊन करण्यात आले असून आरोग्य तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे.
याचबरोबर गावात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत नंदिहल्ली मध्ये दोन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये एक जण बाहेर असल्याचे सांगण्यात आले. नंदिहल्ली येथे हे एका 60 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने निर्जंतुकीकरण व आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.
आता गावातील अनेक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात होत आहे. ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी योग्य त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. आरोग्य खात्याचेही सहकार्य लाभत आहे.
त्यामुळे हा फैलाव रोखण्यासाठी आमचे प्रयत्न जोरदार सुरू असल्याचे सांगितले. कोरोणा सारख्या महाभयंकर रोगाला थोपवण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करू आणि नागरिकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.