यंदाच्या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या नियमावली जिल्हाधिकारी यांनी जाहीर केल्या असून कोरोना मुळे गणेश उत्सव सध्या पद्धतीने साजरा करा असा आदेश जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनीबजावला आहे.
यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार की नाही याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली असताना बेळगावच्या जिल्हाधिकार्यांनी आज सार्वजनिक गणेशोत्सवाची नियमावली जाहीर केली असून यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा असा आदेश काढला आहे.
बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज बुधवारी सार्वजनिक गणेशोत्सवाची नियमावली जाहीर केली असून यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा असा आदेश जारी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार यंदाच्या सार्वजनिक गणेश मूर्तींची मंडपात प्रतिष्ठापना करण्याऐवजी नजीकच्यामंदिरामध्ये प्रतिष्ठापना करून परंपरेनुसार पूजाविधी पार पाडले जावेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रीमूर्ती 4 फुटापेक्षा जास्त उंचीच्या असू नयेत. फटाक्यांच्या आतषबाजीवर पूर्णपणेबंदी असेल. गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही पद्धतीची डॉल्बी सिस्टीम लावण्यात येऊ नये. तसेच प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने संबंधित सरकारी कार्यालय व खात्यांकडून रीतसर परवानगी घेणे अनिवार्य असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक गणेश मूर्ती प्रमाणे घरगुती श्री मूर्तीच्या बाबतीतही नियम काढला असून घरगुती श्री गणेश मूर्ती दोन फुटापेक्षा अधिक उंचीच्या असू नये, असे आदेशात म्हटले आहे.
दरवर्षी संपुर्ण कर्नाटकात बेळगाव शहरांमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात भव्य गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. तथापि यंदा बेळगाव शहरासह राज्यातील कोरोना प्रादुर्भावाची चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा आदेश दिला आहे. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबरोबरच खबरदारीचा उपाय म्हणून मंगलमूर्तीच्या स्वागताची आणि विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येऊ नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सव काळात श्री च्या आरतीप्रसंगी पाचपेक्षा अधिक भक्तांनी त्या ठिकाणी उपस्थित राहू नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तस असेल तर गणपती आणून न अननेला बरा कि