कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे .
सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या बैठकीत पुढे बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी ,स्वातंत्र्यदिनी जिल्हा रमेश जाराकीहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.यावेळी सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांनी मास्क घालावे, सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.कोरोना पार्श्वभूमीवर यावर्षी कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत.त्याचप्रमाणे कोणत्याही शाळा आणि महाविद्यालयाच्या संघांना पथसंचलनात भाग घेण्याची परवानगी मिळणार नाही असे सांगितले.
डॉक्टर, आशा कार्यकर्त्यां आणि कोरोना मुक्त झालेल्या पाच जणांना स्वातंत्र्य समारंभात आमंत्रित करून सन्मानित केले जाईल.कार्यक्रम दरम्यान थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर आणि मुखवटा देण्यासाठी प्रवेशद्वारावर वैद्यकीय पथके तैनात करण्यात येतील.
पथसंचलनात केवळ पोलिस, होमगार्ड, अग्निशमन दल, एनसीसी आणि स्काउट्स कॅडेट्स सहभागी होतील. यावेळी विद्यार्थ्यांच्या संघांना परेडमध्ये परवानगी नाही. या परेडमध्ये केवळ 12 प्लाटून सहभागी होतील असेही त्यांनी सांगितले.
प्लास्टिकच्या ध्वजाची विक्री आणि वापरण्यास मनाई आहे. प्लास्टिकचा झेंडा सापडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा हिरेमठ यांनी दिला.
जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे,पोलिस उपअधीक्षक अमरनाथ रेड्डी, पोलिस उपअधीक्षक अशोक नेली, मनपा आयुक्त जगदीश के.एच., जिल्हा आरोग्याधिकारी मुन्याळ व विविध मान्यवर, उपसमित्यांचे अध्यक्ष, सदस्य बैठकीत उपस्थित होते.