Monday, December 23, 2024

/

कोरोना”बाबत दिलासादायक वृत्त

 belgaum

वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे जनतेसह प्रशासनही भयभीत झाले आहे. त्यातच कर्नाटकात कोरोना रुग्ण वाढीचे सत्र सुरूच आहे. परंतु आज कोरोना रुग्णांच्या बाबतीत एक दिलासादायक वृत्त आले आहे.

राज्यात कोरोना रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून रुग्ण बरे होण्याचेही प्रमाण वाढत आहे. कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी सोमवारी हि माहिती दिली आहे. यासोबतच राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दरात सुधारणा होत आहे, असेहि मंत्री सुधाकर यांनी म्हंटले आहे.

आजपर्यंत कर्नाटकातील रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होणे म्हणजेच रिकव्हरी दर ५४.३६ टक्के इतका होता. आतापर्यंत राज्यात १०० प्रयोगशाळांमध्ये सुमारे १७,२९,०६७ चाचण्या घेतल्या असल्याचे म्हंटले आहे. तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी घेण्यात आलेल्या एकूण चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

सोमवारी केवळ ३२,९८५ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, तर ४ ऑगस्ट रोजी ४२,४५८ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली होती. मात्र यायाबाबत अद्याप आरोग्य विभागाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. सध्या रुग्णांच्या प्रकृतीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होते आहे, हेही नसे थोडके.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.