बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी गावात जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे.
अमित पावले वय 45 रा. आंबेवाडी हा या गोळीबारात जखमी झाले असून त्याना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.सुरुवातीला जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याने सदर जखमीला जखमीला जिल्हा रुग्णांलयातून उपचारासाठी के एल ई ला हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
गोळीबारात जखमी झालेल्या अमित आणित्याच्या मामाचाट कित्येक वर्षा पासून जमिनीबाबत कित्येक वर्षा पासून वाद होता. मागील वर्षी देखील गोळीबार झाला होता त्यावेळी अमित पावले याच्या पायाला गोळी लागली होती आजच्या गोळीबारात त्याला एक गोळी हाताला लागली आहे. या प्रकरणी काकती पोलिसांनी तपास चालवला आहे.