हुक्केरी तालुक्यातील मणगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रस्थापित केलेला पुतळा हटवल्या बाबतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गंभीर आहेत ते कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतील लवकरच त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुनर प्रस्थापित करावा अशी मागणी पत्र लिहून कर्नाटक सरकारला केली आहे अशी प्रतिक्रिया सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
शनिवारी त्यांनी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांना पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बाबत कल्पना दिली आहे.बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती या गावांमध्ये आराध्य दैवत वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर घटनेमुळे महाराष्ट्र – कर्नाटकातील तसेच संपूर्ण देशातील तमाम शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सदर घटनेचे तीव्र पडसाद ठिकठिकाणी उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांनामध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
मनगुत्ती गावातील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. सदर पुतळ्याची प्रतिष्ठापना करताना देखील पोलिसांनी अटकावा केल्याचे समजते. तथापि प्रचंड विरोधाला भिक न घालता गावात शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला. ग्रामपंचायतीच्या परवानगीने हा पुतळा बसवण्यात येऊन देखील स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक सूडबुद्धीने रातोरात तो हटवल्यामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
तेंव्हा कर्नाटक सरकारने संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करून आराध्य दैवत वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करावी, अशा अशायाचा तपशील बेळगावच्या जिल्हाधिकार्यांना धाडण्यात आलेल्या विनंती पत्रात नमूद आहे.सदर विनंती पत्र महाराष्ट्राचे सीमाभागातील समन्वय मंत्री या नात्याने माननीय छगन भुजबळ व एकनाथ शिंदे यांनी बेळगाव जिल्हाधिकार्यांना धाडले आहे.
बेळगावात निषेध-दरम्यान महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी यांना तर बेळगाव शिवसेनेच्या वतीनं माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन निवेदन दिले जाणार आहे.मणगुती गावात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हटविण्याच्या घटनेचा आंम्ही महिला आघाडी तर्फे तीव्र निषेध करीत आहोत अशी प्रतिक्रिया महिला आघाडी अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी दिली आहे.
मणगुत्ती मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुनरप्रस्थापित करा अशी मागणी करणारे पत्र सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे…
Belgaum Live ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 8, 2020