महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे यांची सीमाभाग समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नेमणूक करण्यात आल्यापासून वेळोवेळी प्रत्येक गोष्टीचा सातत्याने शिंदेंकडून पाठपुरावा करण्यात येतो.
महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. परंतु अशा वेळेतही सीमाभागात लक्ष पुरवून त्यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे हे वेळोवेळी संपर्क साधून माहिती घेत बेळगावसाठी पाठपुरावा करत आहेत.
कर्नाटकात मराठी भाषिकांवर प्रत्येकवेळी अन्याय होतो, दडपशाही करण्यात येते. याविरोधात कर्नाटक सरकारशीही त्यांनी चर्चा केली आहे. नुकतेच मणगुत्ती येथे निर्माण झालेल्या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीसंदर्भातील वादाबाबतीतही त्यांनी आवाज उठवून कर्नाटक सरकारला सूचित केले होते.
त्यानंतर शुक्रवारी पिरनवाडी येथे संगोळी रायन्ना आणि छत्रपती शिवरायांच्या मूर्तीबाबत सुरु झालेल्या वादाबाबतीत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पात्र पाठवून सूचना केल्या आहेत.
एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाचे मंत्री आहेत शिवसेनेचे जेष्ठ मंत्री आहेत बेळगाव प्रश्नी त्यांनी तुरुंगवास देखील भोगला होता त्यामुळे त्यांना सीमा भागा बाबत आपुलकी आहे.