कर्नाटक राज्य शाळांत शिक्षण परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या एसएसएलसी परीक्षेचा निकाल कधी जाहीर करायचा याबाबत अद्याप तारीख ठरली नसल्याचे शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी म्हटले आहे.
फेस बुक लाईव्ह च्या माध्यमातून त्यांनी संवाद साधताना उद्या शुक्रवारी 7 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर होणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र केएसईईबी च्या संचालिका सुमंगला यांच्या नुसार निकालाची तारीख ठरली नसली तरी या आठवड्यात निकाल जाहीर होऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे.
सगळीकडे उद्या शुक्रवारी ७ रोजी दहावीचा निकाल होणार अशी बातमी असताना शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी आणि शिक्षण खात्याने याबाबत अद्याप स्पष्टता केलेली नाही या वर्षी परीक्षा लांबणीवर पडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.
आता ही परीक्षा झाल्यानंतर निकाल वेळेत लावण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत मात्र अध्याप निकाल जाहीर करण्याची तारीख ठरली नाही. दुसरीकडे राज्यातील दहावीच्या विध्यार्थी आणि पालकांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.