कोरोनामुळे अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने व हॉस्पिटल्स बंद ठेवली असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन नियमितपणे रुग्णांची सेवा करणाऱ्या आणि गोरगरिबांचे डॉक्टर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या तिघा डॉक्टर्सचा सत्कार ‘नारायणराव जाधव सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठानच्या’ वतीने बुधवारी करण्यात आला.
स्व. डॉ .अनंतराव याळगी यांचा वारसा पुढे चालवणारे डॉ सतीश याळगी, डॉ बी सी येडूर यांचा वारसा पुढे चालवणारे उमेश येडूर आणि खासबाग परिसरातील जनतेचे देवदूत म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते डॉक्टर अनिल पोटे व डॉ सौ सुरेखा पोटे यांचा शाल, श्रीफळ आणि जास्वंदीचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला
हा सन्मान सर्वश्री नेताजीराव जाधव, व्ही एस जाधव गुरुजी, मराठा जागृती निर्माण संघाचे अध्यक्ष गोपाळराव बिर्जे, घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट अध्यक्ष अनंत लाड आदींच्या हस्ते करण्यात आला
यावेळी दत्ता जाधव ,विजय भातकांडे, बापू जाधव ,बाबासाहेब शिंदे , चिमण जाधव ,विजय जाधव ,शंकर मोरे व साईनाथ जाधव आदी उपस्थित होते सत्कार मूर्तींनी सत्कार स्वीकारल्याबद्दल नेताजीराव जाधव यांनी त्यांचे आभार व्यक्त करून त्यांच्या कार्याची ओळख करून दिली.
तर वैद्यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून प्रतिष्ठानचे आभार मानले यावेळी अनंत लाड ,गोपाळराव बिर्जे यांची समयोचित भाषणे झाली
मार्च महिन्यापासून बेळगाव शहरातील छोटं खाजगी इस्पितळ असलं तरी एक दिवस देखील बंद नव्हतं-लहान लहान आजारांवर देखील शनिवार…
Belgaum Live ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 26, 2020