बेळगाव शहराच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांची बदली झाली आहे.
2014 बॅचच्या आय पी एस अधिकारी असलेल्या लाटकर यांची बदली बंगळुरू आय जी कार्यालयात गुन्हे विभागात झाली आहे.
3 जुलै 2017 रोजी सीमा लाटकर यांनी बेळगाव च्या डी सी पी पदाची सूत्रे स्वीकारली होती तब्बल तीन वर्षे एक महिना हुन अधिक काळ त्यांनी या पदावर सेवा बजावली आहे.
मागील जानेवारी महिन्यात देखील त्यांच्या बदलीचा आदेश आला होता मात्र काही दिवसातच तो आदेश रद्द देखील झाला होता. लाटकर यांच्या नंतर नवीन कायदा आणि सुव्यवस्था डी सी पी कोण याबाबत अद्याप आदेश आलेला नाही
गेल्या तीन वर्षात लाटकर यांनी अनेक उपक्रम हाती घेतले होते विशेष म्हणजे राणी चननमा पथकांला नवीन रूप देत महिला सुरक्षेसाठी त्यांनी काम केलं होतं