सध्या सर्वत्र “अनलॉक फेज” सुरु असून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सुरुवातीच्या काळातील प्रशासनाने दाखविलेल्या शिताफीच्या कामात आता मात्र सर्वत्र दिरंगाई आणि दुर्लक्ष केल्याचे प्रकार पुढे येत आहेत.
काल आरोग्य खात्याने प्रसारित केलेल्या बुलेटिनमध्ये सिंधी कॉलनीचा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु या कॉलनीत रुग्ण आढळल्याची बातमी समजूनही कोणत्याच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, अशी तक्रार येथील स्थानिकांनी केली आहे.
या भागातील ५४ वर्षीय पुरुषाचे ५-६ दिवसांमागे सरकारी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या परिवारालाही संशयास्पद रित्या पाहण्यात येत आहे. परंतु याबाबतीत येथील स्थानिकांनाही कोणतीच माहिती नसल्याने स्थानकात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शिवाय या घरातील सर्व सदस्य बिनधास्तपणे बाहेर फिरतानाही दिसत आहेत. या भागाचे नाव यादीत आले असूनही आतापर्यंत सॅनिटायझेशन करण्यात आले नाहीत.
किंवा कोणतेही अधिकारी या भागात चौकशीसाठी आले नाहीत. यामुळे येथील नागरिक चिंताग्रस्त झाले असून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवावे अशी मागणी नागरीकातून करण्यात येत आहे