मार्च महिन्यापासून सुरु असलेल्या आणि जगात हाहाकार माजविलेल्या कोरोनाबाबत जनजागृतीसाठी सरकारने अनेक प्रकारे पाऊले उचलली. त्याचाच एक भाग म्हणून कॉलर ट्यून!
गेले ५ ते ६ महिने हातात फोन घेतला कि सर्वात आधी ऐकू येते ती कोरोनाची कॉलर ट्यून! जनजागृतीचा भाग म्हणून हि कॉलर ट्यून सतत ऐकणे भाग होते. आणि याची नितांत आवश्यकताही होती. परंतु आता बऱ्या प्रमाणात नागरिकांमध्ये कोरोनाविषयी जागृती निर्माण झाली आहे.
आतापर्यंत सतत ऐकू येणारी हि ट्यून बहुतांशी नागरिकांना तोंङपाठही झाली असेल. पण आता मात्र सतत ऐकू येणाऱ्या या ट्युनमुळे एखादा महत्वाचा फोनकॉल करणे अवघड झाले आहे. याबाबतीत सोशिअल मीडिया वर अनेक उपहासात्मक गोष्टीही सामोऱ्या आल्या आहेत.
अनेक विनोदांनी तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ही कॉलर ट्यून ऐकण्याआधी थेट समोरच्याशी संपर्क करण्याच्या युक्त्याही युट्युब वर प्रसारित झाल्या आहेत. मात्र आता हा कॉलर ट्युनचा प्रकार बंद करावा, अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे.
या ट्युनमुळे एखादा महत्वाचा संदेश देतेवेळी अडचणी निर्माण होत आहेत. कोरोना हा प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आणि पुरेशी जनजागृतीही झाली आहे. त्यामुळे सरकार, आणि टेलिकॉम कंपन्यांनी आता हा प्रकार आवरता घेतला पाहिजे, अशी प्रत्येकाच्या मनातील इच्छा आहे.