लेक व्ह्यू हॉस्पिटलने कोविड केअर सेंटर सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.रोहन रेसिडेंशी हॉटेलच्या संयुक्त विद्यमाने लेक व्ह्यू हॉस्पिटलने कोविड केअर सेंटर सुरु केले आहे.रोहन रेसिडेंशीच्या इमारतीत हे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.
असिम्पटमेटिक आणि कोरोनाची मध्यम लक्षणे दिसून येणाऱ्या रुग्णावर या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यास सुरुवात झाली आहे.डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ येथे सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत.
चाळीस बेडची व्यवस्था रोहन रेसिडेंशीमध्ये करण्यात आली आहे.रविवारपासून सुरु झालेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
प्रशासनाने खासगी हॉस्पिटलना कोविड केअर सेंटर सुरु करण्याचे आवाहन केले होते.त्याला आता प्रतिसाद मिळण्यास प्रारंभ झाला आहे.