सोमवार 24 रोजी कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी के शिवकुमार तर मंगळवारी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा हे बेळगाव दौऱ्यावर असणार आहेत.
मंगळवारी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा हे बेळगाव दौऱ्यावर यायची शक्यता आहे अशी माहिती बंगळुरू विधानसभेटली सूत्रांनी दिली आहे.बेळगाव आणि धारवाड जिल्ह्यातील कोविड नियंत्रण आणि बेळगाव जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.सुवर्ण सौध मधील सेंट्रल हॉल मध्ये बैठक घेणार आहेत अशीही माहीती उपलब्ध झाली आहे.
मुख्यमंत्र्यां कोरोना मुक्त झाल्या नंतर प्रथमच इतक्या लांब बेळगाव जिल्ह्याचा दौरा करत आहेत प्रथमच बंगळुरू बाहेर येत आहेत आहे.बऱ्याच कालावधी नंतर त्यांचा हा बेळगाव दौरा असणार आहे.
सोमवारी के पी सो सी अध्यक्ष डी के शिवकुमार हे बेळगाव जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.गोकाक आणि घटप्रभा येथे भेट देऊन पूरग्रस्त भागाची पहाणी करणार असून बेळगाव आणि चिकोडी विभाग काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक देखील घेणार आहेत