Thursday, December 19, 2024

/

दुचाकीऐवजी आता सायकली बनत आहेत चोरट्यांचे लक्ष्य

 belgaum

दुचाकीऐवजी आता सायकली बनत आहेत चोरट्यांचे लक्ष्य : उपनगरांमधील नागरिक हैराण -शहराच्या उपनगरांमध्ये सध्या सायकल चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. दुचाकींऐवजी आता चोरट्यांनी सायकलींना आपले लक्ष करण्यास सुरुवात केल्याने नागरिक हैराण झाले असून पोलिसांनी या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे

सध्या भाग्यनगर हिंदवाडी टिळकवाडी या उपनगरात सायकली चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. या चोरीच्या घटनांपैकी संबंधित मोजक्याच नागरिकांकडून पोलिसात तक्रार नोंदविली जात आहे. तथापि सायकल चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने या भागात भितीचे वातावरण पसरले आहे गेल्या फक्त एका आठवड्यात भाग्यनगर येथील चार सायकली चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. मात्र त्या सायकल मालकांनी पोलिसात तक्रार नोंदवली नाही. तथापि आपली सायकल चोरीला गेल्यामुळे कांही आठवड्यांपूर्वी एका इसमाने पोलिसात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांनी त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचे तसेच तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा संबंधित इसमाचा आरोप आहे

भाग्यनगरलगत घर असणारे हिंदवाडी येथील रहिवासी संदीप हावळ यांच्या मते सध्या बेळगाव शहरात सायकल चालवण्याचे फॅड वाढले आहे. व्यायामाचे साधन म्हणून वापर करण्याऐवजी फॅशन म्हणून सायकलींचा वापर केला जात आहे. यासाठी हायटेक सायकली खरेदी केल्या जात आहेत. या हायटेक सायकलींची किंमत 7 हजारापासून 2 लाखापर्यंत असते. शिवाय या सायकलींचे वजन खूपच हलके असते. दुचाकी वाहनांच्या तुलनेत या सायकलींचे कुलूप अत्यंत तकलादू असते. याचा फायदा चोरट्यांनी उठविण्यास सुरुवात केली आहे.

स्वतःला उच्चभ्रू समजणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने जमेची बाजू ही असते की 40-50 हजाराची सामान्य दुचाकी चोरीला जाण्यापेक्षा दीड-दोन हजार रूपयांची सायकल चोरीला गेली मग कशाला पोलिसात तक्रार नोंदवायची? स्वतःला पैसेवाले समजणाऱ्या या लोकांच्या या मनःस्थितीचा नेमका फायदा सध्या चोरट्यांनी उचलण्यास सुरुवात केली आहे.

Bycycle theft got cctv
Bycycle theft got cctv footage

भाग्यनगर येथे सायकल चोरीच्या प्रयत्नाचा एक व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्यामध्ये असे दिसते की, एक शाळकरी मुलगा अपार्टमेंटच्या पार्किंग लाॅटमध्ये ठेवलेली ठेवलेली सायकल सोडण्याचा प्रयत्न करतोय. परंतु सायकल चेन्नईने एका पिलरला बांधून ठेवलेली असल्यामुळे त्याला ती सायकल चोरता आली नाही. दरम्यान अपार्टमेंट बाहेर सायकल घेऊन थांबलेला असलेला त्याचा मित्र त्याला सावध करण्यासाठी उभा आहे. या प्रकारानंतर अल्पावधीत भाग्यनगर 9 वा क्रॉस येथील एका अपार्टमेंटमधील तब्बल 20 हजार रुपये किंमतीची सायकल चोरट्यांनी लंपास केली. परंतु सायकल मालकाने याबाबत पोलिसात तक्रार केली नाही, अन्यथा सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या त्या चोरट्यांच्या छबीद्वारे गुन्हेगारांचा शोध लागू शकला असता.

दरम्यान सध्याचे कोरोना प्रादुर्भावाचे वाढते संकट लक्षात घेऊन पोलीस चोरट्यांना गजाआड करण्यास धजावत नसल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात स्थानिक पोलिसांची संपर्क साधला असता चोरीची तक्रार दाखल केली नाही तर आम्ही काय करणार? असा प्रतीप्रश्न त्यांच्याकडून केला जात आहे. त्याप्रमाणे कोरोनाचा पोलीस तपासाशी कांहीही संबंध नाही. आम्ही आमचे कर्तव्य चोख बजावत आहोत, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.