कोविड रुग्णांना बेडची कमतरता असल्याकारणाने प्रत्येक रुग्णालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या.
रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी कोणत्या रुग्णालयात किती बेड्स रिकामी आहेत याची माहिती पुरविण्याची मागणी करण्यात येत होती. या अनुषंगाने बेळगाव जिल्हा रुग्णालयाने गेल्या दोन दिवसांपासून याची मोजणी केली आहे.
शुक्रवार दि. २८ ऑगस्टच्या अहवालानुसार बीम्समध्ये एकूण ७४० बेड्स आहेत. त्यापैकी ४३० बेड्स हे कोविड रुग्णांसाठी सध्या उपलब्ध असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे.
बीम्समधील ७४० बेड्समधील ३१० बेड्स हे ऑक्सिजन बेड्सच्या यादीत समाविष्ट आहेत. तर उर्वरित ४३० बेड्स हे नॉन-ऑक्सिजनच्या यादीत समाविष्ट आहेत.