शिवभक्तांच्या भावनांचा आदर करून मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती तात्काळ बसविण्यात यावी, अशी मागणी समस्त छ. शिवभक्त बेळगाव यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
समस्त छ. शिवभक्त बेळगावतर्फे आज सोमवारी सकाळी सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथे प्रतिष्ठापित छ. शिवाजी महाराजांची मूर्ती प्रशासनाने कांही मोजक्या संघटना आणि लोकांच्या दबावाखाली येऊन रातोरात हटविली आहे. त्यामुळे देशभरातील समस्त शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. छ. शिवाजी महाराज हे अखंड देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याबाबतीत झालेला अपमान सहन केला जाऊ शकत नसल्यामुळे त्यांची मूर्ती हटविण्याच्या कृतीचा आम्ही निषेध करतो.
मागील कांही दिवसांपासून कर्नाटकात सोशल मीडियावर अवमानकारक लिखाण, शालेय अभ्यासक्रमातून महाराजांचा इतिहास काढून टाकणे आणि आता मूर्ती हटविण्याचे हे कृत्य, असे अवमानकारक प्रकार वाढत आहेत. याची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने हे प्रकार वेळीच थांबवावेत.
त्याप्रमाणे मनगुत्ती येथील प्रकरण अधिक चिघळण्यापूर्वी कडक भूमिका आणि पुढाकार घेऊन त्याठिकाणी शिवरायांची मूर्ती ताबडतोब प्रतिष्ठापित करावी अशी आम्हा समस्त शिवभक्तांची एकमुखी मागणी आहे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही-बेळगावातील शिवप्रेमींचा जिल्हा प्रशासनाला इशारा-पहा खालील व्हीडिओ
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही-बेळगावातील शिवप्रेमींचा जिल्हा प्रशासनाला इशारा
Belgaum Live ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 10, 2020