बेळगांव शहरातील कोरोना संसर्गाचा वेग वाढला असून आता रेल्वे स्टेशन येथील हेस्कॉम कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आज गुरुवारी हे कार्यालय सील डाऊन करण्यात आले.
दोन कर्मचारी कोरोनाग्रस्त झाल्यामुळे रेल्वे स्टेशन येथील हेस्काॅम कार्यालय आज गुरुवारपासून सलग चार दिवस म्हणजे रविवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. सदर कार्यालयातील एक कर्मचारी आणि मीटर रीडिंग घेणारा एक कर्मचारी असे दोघेजण कोरोनाग्रस्त झाल्याचे आज गुरुवारी स्पष्ट झाले आहे. परिणामी सदर कार्यालय तात्काळ सील डाऊन करण्यात आले.
आता या कार्यालयाचे व्यवस्थित यांनी सॅनिटायझेशन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना काॅरंटाईन व्हावे लागणार आहे.
रेल्वे स्टेशन येथील हेस्कॉम कार्यालय एकदम सोमवार दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी सुरू होणार आहे. उपरोक्त घटनेमुळे आता सरकारी कार्यालयात देखील कोरोनापासून सुरक्षित नाहीत हे स्पष्ट झाले आहे.