बेळगावात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील इस्कॉनच्यावतीने श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सवाचे 12 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी कोरोना वैश्विक महामारीमुळे हा महोत्सव ऑनलाइन/डिजिटल पद्धतीने साजरा करण्यात येईल.
तरी सर्वांनी या महोत्सवात सहभागी होऊन श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करावी.दान देणाऱ्या भक्तांच्या कुटुंबियांच्या वतीने मंदिरातील ब्रह्मचार्याद्वारे जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांच्या श्री विग्रहांचा अभिषेक करण्यात येईल. हा अभिषेक आपल्या घरी बसून पाहता येईल.
जन्माष्टमी दिवशी होणारे कार्यक्रम या प्रकारे:
मंगल आरती पहाटे 4:30 वा.,
शृंगार दर्शन 7:30 वा,
गुरु पूजा 7:40 वा
श्रीमद् भागवत प्रवचन 8 वा.
अभिषेकाची वेळ 9 तारखे नंतर कळविण्यात येईल.
विशेष प्रवचन रात्रौ 9 वा
महाआरती रात्री 12 वा.
हे सर्व कार्यक्रम इस्कॉन बेळगाव च्या फेसबुक पेज वर लाईव्ह पाहू शकता.
कोरोनामुळे ऑगस्ट 11, 12 आणि 13 या तीन दिवशी मंदिरातील दर्शन पूर्णपणे बंद राहील.
जे भक्त याप्रसंगी दान देऊ इच्छितात त्यांनी खालील आय सी आय सी आय बँक ,आर पी डी क्रॉस शाखा अकाउंट 017601003610 या इस्कॉन च्या खात्यात रक्कम जमा करावी ही विनंती .आपले नाव व ट्रांजेक्शन डिटेल्स या 9035330070 व्हाट्सअप नंबर वर पाठवून द्या, जेणेकरून आम्ही आपल्याला त्याची पावती देऊ .अधिक माहिती करिता खालील नंबर वर संपर्क साधा.
संकर्षन दास: 861815 39 64
मदन गोविंद दास : 9448758650 असे आवाहन इस्कॉन द्वारे करण्यात आले आहे