स्वच्छ भारत अभियानाचा भाग असलेल्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या पाचव्या वार्षिक सर्वेक्षणातील निकालाची घोषणा मंत्री हरदीपसिंग यांनी नुकतीच केली.
या सर्वेक्षणानुसार ३८२ स्थानांपैकी बेळगाव २२८ व्या स्थानी आहे. तर राष्ट्रीय पातळीवर कर्नाटक १०व्या स्थानावर आहे. कॅंटोन्मेंट बोर्ड हे ३८ व्या स्थानी असून २०१९ च्या सर्वेक्षणात हे बोर्ड ४४व्या स्थानी होते तर २०१८ साली ५१ व्या स्थानी होते. याचप्रमाणे २०१७ साली बेळगाव २४८ व्या स्थानी तसेच २०१८ मध्ये २६८, २०१९ मध्ये २७७ आणि यंदा २२८व्या स्थानी बेळगावचे नाव आहे.
इंदोर हे शहर भारतातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असून छत्तीसगढ हे पुन्हा एकदा राज्यांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. तर स्वच्छतेच्या बाबतीत एक लाखाहून अधिक लोकसंख्या असणारे महाराष्ट्रातील नवी मुंबई हे शहर तिसर्या क्रमांकावर आहे.
प्रत्येक वर्षी शहर आणि गावांना स्वच्छतेच्या क्रमवारीनुसार गौरविण्यात येते. या पार्श्वभूमीवर २०१४ साली स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेचे महत्व समजावे आणि आपल्या आजूबाजूचा परिसर सर्वानी मिळून स्वच्छ राखावा हा या अभियानाचा उद्देश होता.