54 वर्षाची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या कंग्राळ गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा करोणाच्या महामारीत सरकारी नियमाचे पालन करीत गल्लीतील सार्वजनिक श्री गणेश मूर्तीचे आगमन व प्रतिष्ठापना सकाळी 11 वाजता करीत एक आदर्श समाजापुढे ठेवला.
मंडळाचे अध्यक्ष मनोहर बडवाणाचे ,उपाध्यक्ष ज्योतिबा पाटील,, सचिव किरण सांबरेकर व यंदाचे मूर्ति पुरस्कर्ते परशराम दरवदर माजी अध्यक्ष नितीन पाटील महादेव बडवण्याचे मंजुनाथ सांबरेकर केतन चौगुले अक्षय पाटील या मोजक्याच कार्यकर्त्यांसह सार्वजनिक मूर्तीचे वाजत-गाजत सोशल डिस्टन्स चे पालन करत गल्लीत मूर्तीचे आगमन करण्यात आले.
गल्लीत मूर्ती आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत ढोल ताशे वाजवीत पंच अनंत जाधव ,गोपाळ सांबरेकर बाबुराव कुंटे महेश मोरे व इतर बाल गोपाळ व कार्यकर्ते उपस्थित होते सायंकाळी आठ वाजता श्रीच्या पहिल्या आरती चे आयोजन करण्यात आले परशराम दरवदर दांपत्य यांच्या हस्ते पहिली श्रीची आरती करण्यात आली.
![Ganesh wel come bgm](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/08/FB_IMG_1598084998335.jpg)
बेळगाव शहर आणि उपनगरात बाप्पाचे आगमन उत्साहात झाले. नियम पाळून, काही ठिकाणी वाजत गाजत बाप्पा दाखल झाले. गणेश भक्तांचा उत्साह कायम आहे.
घरगुती गणेश मूर्ती घरी आणण्यास काल रात्री पासूनच सुरवात झाली होती.
गर्दी टाळण्यासाठी आज पहाटे पासून नागरिकांनी घरगुती बाप्पा घरी आणून प्राणप्रतिष्ठापना केली.
सर्वांना सुट्टी असल्याने घरचे नैवेद्य उरकून सार्वजनिक बाप्पा आणले जात आहेत. जास्त काही करता येत नसले तरी गणपती बाप्पा चे स्वागत करण्याचा उत्साह कायम आहे.
यावर्षी गणपती आणण्यासाठी गर्दी होत असली तरी नियम पाळण्यात येत आहेत. बाप्पा आले आणि विराजमान झाले आता घरी त्यांच्या पूजा, आदर आणि आरतीचे नियोजन सुरू आहे.