लॉकडाऊननंतर बेळगावच्या विमानतळावरून उत्कृष्ट सेवा पुरवत अधिकाधिक उड्डाण करत झेपावणाऱ्या सांबरा विमानतळाचे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून कौतुक करण्यात आले आहे.
यासंदर्भात नुकतेच ऑथॉरिटीने ट्विट केले असून बेळगावमधून तब्ब्ल ३९ हजाराहून अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याचे नमूद केले आहे. यामुळे देशातील प्रमुख विमानतळांपैकी आता बेळगाव विमानतळाचे नाव प्रामुख्याने घेतले जाऊ लागले आहे.
लॉकडाऊन नंतर सुरु झालेल्या विमानसेवेला २५ मेपासून पुन्हा प्रारंभ करण्यात आला. दरम्यान २५ ऑगस्टपर्यंत बेळगावमधून सुमारे ३९ हजारहून अधिक प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे
तर १२०० हुन अधिक विमानांची ये-जा झाली आहे. देशांतर्गत सेवेने अद्यापही गती घेतली नाही परंतु तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात उड्डाण होणे हा एक विक्रम असल्याचे ऑथॉरिटीने म्हटले आहे.
ही देखील न्यूज वाचा…