एपीएमसीमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या भाजीमार्केट येथे भरपूर गर्दी होत आहे. त्यामुळे येथे सुरक्षित अंतर ठेवण्याचा बोजवारा उडत आहे. त्यामुळे नुकतीच एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण होऊन त्याचा मृत्यू झाला आहे तर आणखी सहा जण कोरोणा बाधित आढळले आहेत. त्यामुळे आता एपीएमसी बरोबरच भाजी मार्केटमध्ये धास्ती वाढली आहे.
सध्या दोन दिवस एपीएमसी बटाटा गूळ दुकानं दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही धास्ती मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिक भयभीत होऊ लागले आहेत.
परिणामी कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
मार्केट यार्डातील एक व्यापारी काल दगावला होता तर आणखी चौघे जण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत अश्या वेळी अनेक मोठ्या व्यापाऱ्यांनी दुकान बंद करून घरीच रहाणे पसंद केले आहे.
येत्या आठवडाभरात एपीएमसी मार्केट काही काळासाठी बंद ठेवण्याची मागणी होत आहे. सध्या पहाटे पाच ते दुपारी एकपर्यंत भाजी मार्केट सुरू ठेवण्यात येत आहे. मात्र गर्दी वाढत असल्याने येथे कोरोना बाधित अधिक पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजी मार्केट मध्येही धास्ती वाढली आहे.