आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने २३ मार्च ते १६ ऑगस्ट या दरम्यान तब्ब्ल २० लाखाहून अधिक कोरोना चाचण्या घेतल्या आहेत, अशी माहिती कर्नाटक सरकारने जाहीर केली आहे.
जास्तीत जास्त चाचण्या घेणाऱ्या पहिल्या राज्यांपैकी कर्नाटकाचा समावेश आहे.
बेंगळूरमधील केआयडीडब्ल्यू या प्रयोगशाळेने सर्वाधिक म्हणजेच १,०५,६२४ इतक्या चाचण्या घेतल्या असून गुलबर्ग्यातील जीआयएम्स ने ८८,३२३, एनआयएमएएचएएनएस ने ८१,८१६, आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ने ७९,५९५ इतक्या चाचण्या घेतल्या आहेत.
न्युबर्ग आनंद खाजगी या प्रयोगशाळेत सर्वाधिक चाचण्या म्हणजेच ६९,८९७ चाचण्या घेण्यात आल्या असून १६ ऑगस्टपर्यंत सर्व खाजगी प्रयोगशाळांमध्ये तब्ब्ल साडेचार लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत.