Saturday, December 21, 2024

/

मृतांच्या संख्येने ओलांडला 2 हजाराचा टप्पा : रुग्ण संख्येत 6,128 जणांची भर

 belgaum

राज्यात दिवसभर आढळणाऱ्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवार दि. 30 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नव्याने 6,128 रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,18,632 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे आजतागायत 2,230 जणांचा बळी घेतला आहे

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार दि. 29 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज गुरुवार दि. 30 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 6,128 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 18 हजार 632 इतकी झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 69,700 असून यापैकी 620 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात आज गुरुवारी 3,793 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 46,694 इतकी झाली आहे. काल सायंकाळपासून आज दिवसभरात कोरोनामुळे आणखी 83 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 2,230 झाली असून यापैकी 8 जणांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे. विशेष म्हणजे 2,233 रुग्ण सापडल्यामुळे बेंगलोर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजाराहून अधिक झाली आहे.

कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आज सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पहिल्या पांच क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 2233 रुग्ण – एकूण रुग्ण 53324), म्हैसूर (430-4013), बेळ्ळारी (343-6063), उडपी (283-4778), बेंगलोर ग्रामीण (224-2151) आणि बेळगाव (202-3013).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.