बेळगाव जिल्ह्यात मंगळवारी सकाळी कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे.रायबाग रायबाग तालुक्यातील चिंचली गावातील 27 वर्षाचा युवक कोरोनामुळे मृत्युमुखी पडला आहे.चिंचलीतील युवकाचा कोरोनाने बळी गेल्यामुळे तो युवक राहत असलेला भाग सील करण्यात आला आहे.
चिंचलीतील तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाने मृत झालेल्याची संख्या 15 झाली आहे.बेळगाव जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते आज मंगळवारी पन्नास हून अधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
कोरोनाने आता सगळीकडे आपले हातपाय पसरण्यास प्रारंभ केला असून लोकप्रतिनिधी देखील कोरोनामुळे क्वारंटाईन झाले आहेत.कोरोना वॉरियर्स असणाऱ्या शहरातील दोन हुन अधिक डॉक्टरना देखील कोरोनाची लागण झाली आहे अशीही माहिती उपलब्ध झाली आहे . समाजातील सर्वच थरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जनतेला पावसाळ्यात विशेष काळजी घ्यावी लागेल.
आमदार होम कवारंटाईंन – उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्यात कोरोनाची लक्षण डसली आहेत त्यामुळे ते घरीच आहेत त्यांच्या निकटवर्तीय असलेले कार्यकर्ते देखील होम कवारंटाइन झाले आहेत. आमदारांनी महिन्या अगोदर एक चाचणी केली होती ती निगेटिव्ह आली होती मात्र चार दिवसापूर्वी केलेली चाचणीचा अहवाला बद्दल आमदारांनी प्रतिक्रिया देणे गरजेचे आहे