गेल्या 24 तासांत राज्यभरात सलग पाचव्या दिवशी 5 हजारहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 28 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,07,001 इतकी झाली आहे. कोरोनामुळे आणखी 102 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 2,055 झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यात आज मंगळवारी नव्याने 228 रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2,532 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे आज आणखी 6 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या 58 झाली आहे. जिल्ह्यात ॲक्टिव्ह केसेस 1,760 असून यापैकी 9 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. काल सायंकाळपासून आज दिवसभरात हॉस्पिटलमधून 34 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे जिल्ह्यात डिस्चार्ज मिळालेल्यांची एकूण संख्या 739 इतकी झाली आहे.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 27 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज मंगळवार दि. 28 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 5,536 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 7 हजार 001 इतकी झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 64,434 असून यापैकी 612 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात आज मंगळवारी 2,819 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 40,504 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 102 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 2,055 झाली असून यापैकी 8 जणांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.
कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आज सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पहिल्या पांच क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 1898 रुग्ण – एकूण रुग्ण 48821), बेळ्ळारी (452-5382), कलबुर्गी (283-4778), बेळगाव (228-2532) आणि म्हैसूर (220-3383).
बेळगावात सापडलेले 228 रुग्ण खालील प्रमाणे आहेत