शहरातील युवासेना बेळगाव या संघटनेतर्फे आज शनिवारी सकाळी येळ्ळूर राजहंस गड परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी हिंदुस्थानातील प्रत्येक नागरिकाने पावसाळ्यात एक झाड लावून त्याचे जतन करावे, असे आवाहन केले आहे.
त्यांच्या आवाहनानुसार युवा सेना बेळगावतर्फे आज सकाळी येळ्ळूर राजहंस गड येथे हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांमध्ये युवासेनेचे पदाधिकारी व सदस्यांसह नागरिकांचाही सहभाग होता.
पर्यावरण प्रदूषण व झाडे लावण्यात युवकांचा सहभाग महत्वाचा आहे बेळगावातील युवक ऐतिहासिक वास्तू जपणे असो गड किल्ले स्वच्छ करणे असो किंवा गडावर वन महोत्सव करून झाडे लावणे असे असे उपक्रम राबवताना दिसत आहेत.
येळ्ळूर गड किल्ल्यावर शासनाकडून लाखो रुपये खर्चून छ्त्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे त्यामुळे या गडाची स्वछता आणि झाडांची लागवड याला महत्व प्राप्त झाले आहे.