वनखात्याच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील यांच्या नेतृत्वाखालील फॉरेस्ट ट्रॅफिक स्क्वाडने आज आज शुक्रवारी कट्टनभावी येथे कारवाई करताना बेळगाव जिल्ह्यातून महाराष्ट्रात कासवांची तस्करी करणाऱ्या एका इसमाला अटक करून त्याच्याकडील दोन कासवं जप्त केले.
अर्जुन कल्लाप्पा नायक (वय 45, रा. बेळगांव) असे वनखात्याच्या पथकाने अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे. जंगलात पकडलेले दोन कासवं एका बकेटमध्ये घालून अर्जुन त्या कासवांची महाराष्ट्रात तस्करी करण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी कट्टनभावी येथे वनखात्याच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकून त्याला रंगेहात पकडले.
तसेच त्याच्याकडील बकेटसह त्यातील दोन कासवं जप्त केली. सदर कासवं अनुक्रमे 2 किलो 100 ग्रॅम आणि 1किलो किलो 600 ग्रॅम वजनाची आहेत.
प्राणी संरक्षण कायद्याखाली अर्जुन नायक याला अटक करून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.