कोरोना फायटर म्हणून लढणाऱ्या नर्सला शुक्रवारी कोरोनाची बाधा झाल्यावर शनिवारी तीन जिल्हा सशस्त्र दलाच्या पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.
कोगनोळी टोल नाका रायबाग अश्या विविध ठिकाणी या पोलिसांनी सेवा बजावली होती या शिवाय ते बेळगाव शहरातील पोलीस हेड क्वाटर्स मध्ये सेवा बजावत होते.
या तिन्ही पोलिसांच्या प्राथमिक संपर्कात आलेल्याना पोलीस हेड क्वाटर्स मध्ये क्वारंटाइन करण्यात येणार अशी बातमी पसरताच स्थानिकांनी विरोध देखील केला आहे.