गेल्या अनेक दिवसांपासून बेळगाव परिसरातील दुचाकी वाहन चोरणाऱ्या तीन जणांच्या टोळीला गजाआड करण्यात आलं आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी तिघांना अटक करून अटक करून त्यांच्या जवळील सहा लाख पन्नास हजार रुपये किंमतीची 18 दुचाकी वाहन जप्त केली आहेत.
बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
अक्षय शंकर चौगुले वय 22 रा. मारुती गल्ली मच्छे,महेश भावकाना अनगोळकर वय 19 व आकाश भावकाना अनगोळकर वय 21 रा. बसवणं कुडची बेळगाव अशी अटक केलेल्या तिघा दुचाकी चोरट्यांची नावे आहेत यातील दोघे भाऊ आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 9 जुलै रोजी राजहंस गड किल्ला परिसरात दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकरण नोंद झाले होते या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुनील कुमार नंदेश्वर यांनी चालवला होता त्यानुसार पोलिसांनी संशयितांवर नजर ठेवली होती.गुरुवारी सकाळी वाघवडे क्रॉस जवळ तिघा संशयितांना फिरताना चौकशी केली असता या तिघा चोरांनी बेळगाव परिसरात दुचाकी चोरल्याचे कबूल केले.
बेळगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे मोठ्या प्रमाणात चोरी केलेल्या गाड्या जप्त केल्याने पोलीस आयुक्तांनी ग्रामीण पोलिसांचे अभिनंदन केले आहे.