टायफाईड या तापाच्या आजाराने शिवाजी नगर येथे तेरा वर्षीय बालक दगावला आहे.जतीन जगदीश पुरोहित असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे.
गेल्या तीन दिवसां पासून ताप आल्याने तो आजारी होता त्यामुळे त्याला खाजगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते शनिवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला आहे.
आर टी ओ सर्कल शिवाजी नगर बेळगाव येथील जगदीश पुरोहित स्वीटसचे मालक आणि सामाजिक कार्यकर्ते जगदीश पुरोहित यांचा तो चिरंजीव होता.लव डेल स्कुल मध्ये इयत्ता सातवीत शिकत होता.
गेल्या आठवड्यात वडगांव विष्णू गल्लीत डेंग्यू मुळे एक बालक दगावला होता आता टायफाईड मुळे रामतीर्थनगर येथील या बालकाचा जीव गेला आहे.कोरोना काळात पालकांनी स्वता बरोबर आपल्या लहान मुलांच्या तब्येतीची काळजी घेणे जरुरी बनले आहे.