सलग तिसऱ्या दिवशी बेंगलोर शहरात प्रचंड प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. आज एका दिवसात राज्यातील 2,798 रुग्णांपैकी एकट्या बेंगलोर शहरात 1,533 इतके उच्चांकी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या 24 तासातील 70 पैकी 23 मृत्यू बेंगलोरमधील आहेत.
बेंगलोर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी ही माहिती दिली. राज्याने 20,000 हे आरटीपीसीआर तपासण्यांचे उद्दिष्ट पार करताना आज एका दिवसात 20,282 जणांच्या तपासण्या केल्या आहेत. राज्यभरात सध्या बेंगलोरमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
राज्याच्या या राजधानीत सध्या 13,220 अॅक्टिव्ह केसेस असून राज्यातील अॅक्टिव्ह केसेस 21,833 इतक्या आहेत, असे मंत्री सुधाकर यांनी सांगितले.
मंत्री डॉ. सुधाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात राज्यात 70 जणांचे कोरोनाने बळी घेतले असून एकट्या बेंगलोरमध्ये 23 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 880 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून यापैकी बेंगलोरचे 480 जण आहेत. तथापि भारतातील अन्य राज्यांच्या तुलनेत कर्नाटकातील मृत्यूचा दर खूप कमी आहे. सध्या राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर 1.69 टक्के असून बेंगलोरमधील 1.3 टक्के आहे. या उलट भारतातील मृत्युदर 3 टक्के आणि जगातील मृत्युदर 4.5 टक्के इतका असल्याची माहितीही वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी पत्रकारांना दिली.
बेळगावात तीन रुग्ण वाढले
शनिवारी बेळगाव जिल्ह्यात नवीन 3 कोरोना पॉजीटिव्ह रुग्ण सापडले आहेत.एक गोकाक तर 2 अथणी येथील आहेत त्यामुळे बेळगावची संख्या एकूण 468 झालो आहे. 346 बरे झाले असून 116 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.