अभ्यासाचे दडपणातून मानसिक स्थिती बिघडलेल्या एका इंजिनिअरिंग शाखेच्या विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील सदाशिवनगर येथे आज शनिवारी उघडकीस आली.
आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव तन्मय महेंद्रकर (वय 23) असे असून तो हुबळी येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. सदाशिवनगर येथील हरिद्रा गणपती मंदिरासमोर असलेल्या आपल्या निवासस्थानी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सदर घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला अभ्यासाच्या तणावामुळे त्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.