बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाऊनची अमलबजावणी कडकपणे करण्यात आल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
शहरातील एकही रस्त्यावर वाहन किंवा व्यक्ती दिसून आल्या नाहीत.दूध आणि औषध दुकाने सोडून अन्य दुकाने बाजारपेठ बंद होती.नेहमी गर्दी असणाऱ्या मध्यवर्ती बस स्थानकावर कोणतीही वर्दळ दिसून आली नाही.
सकाळी लवकर पोलीस लॉक डाऊनची कडक अमलबजावणी करण्यासाठी सेवा बजावत असलेले पाहायला मिळाले.शहरात बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.संपूर्ण जिल्ह्यातील सगळे व्यवहार लॉक डाऊनमुळे बंद होते.
कोगनोळी चेकपोस्टवर देखील अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने कर्नाटकात सोडण्यात येत होती.