राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यातील 20 रुग्णांसह राज्यात एकूण 1,498 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून आणखी 15 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
त्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 7 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 26,815 इतकी झाली असून कोरोनामुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 416 झाली आहे. बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात 20 रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 414 इतकी वाढली आहे.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 6 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज मंगळवार दि. 7 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 1,498 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 26 815 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 15,297 असून यापैकी 279 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
राज्यभरात मंगळवारी 571 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 11,098 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 15 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 416 झाली असून यापैकी चौघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.
कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून त्यापैकी गेल्या 24 तासात बेंगळूर ग्रामीण वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी पहिल्या तीन क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 800 रुग्ण – एकूण रुग्ण 11,361), मंगळूर (84-1351), धारवाड (57-668), आणि बेळगाव (20-414). बेळगाव जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्ण 94 असून आत्तापर्यंत 313 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.