Wednesday, January 1, 2025

/

कोरोनाचा विस्फोट : राज्यात आढळले 4,169 रुग्ण, मृतांचा आकडा हजाराच्या वर

 belgaum

गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवार दि. 16 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणखी तब्बल 4,169 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 51,422 इतकी झाली आहे. राज्यात आणखी 104 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांच्या आकड्याने 1 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

बेळगाव जिल्ह्यात आज गुरुवारी कोरोनाचा जणू उद्रेकच झाला असून नव्याने 92 रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 694 झाली आहे. जिल्ह्यात ॲक्टिव्ह केसेस 300 असून आणखी 3 जण मृत्यूमुखी पडल्यामुळे मृतांचा आकडा 17 झाला आहे. काल सायंकाळपासून आज दिवसभरात 15 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे जिल्ह्यात डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 377 इतकी झाली आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार दि. 15 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज गुरुवार दि. 16 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 4,169 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 51,422 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 30,655 असून यापैकी 539 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात आज गुरुवारी 1,263 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 19,729 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 104 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 1,032 झाली असून यापैकी 6 जणांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे. आज मृत्युमुखी पडलेल्या 104 जणांपैकी तब्बल 70 जण बेंगलोर शहरातील आहेत हे विशेष होय.

कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी पहिल्या तीन क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 2344 रुग्ण – एकूण रुग्ण 25288), मंगळूर (238-2758), धारवाड (176-1574) आणि बेळगाव (92-694).

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.