राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून आज राज्यात ४७६४ कोरोनारुग्णांची वाढ झाली आहे. यासोबतच आज राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७५८३३ इतकी झाली आहे. बेळगाव जिल्ह्यात आज २१९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या वतीने प्रसारित करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये देण्यात आली आहे.
सर्वत्र खबरदारी घेत असूनही राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यासोबतच उपचाराअंती बरे होऊन जाणाऱ्यांची आजची संख्या १७८० इतकी असून संपूर्ण राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या २७२३९ इतकी आहे. याप्रमाणे आज ५५ जणांच्या मृत्यूची नोंदही झाली आहे. राज्यात आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १५१९ इतकी आहे.
बेळगाव जिल्ह्यात एका दिवसांत रेकॉर्ड ब्रेक 219 पोजिटिव्ह रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 1315 झाली आहे तर ऍक्टिव्ह रुग्ण 859 झाले आहेत. बुधवारी शहरात चव्हाट गल्ली आणि करिअप्पा कॉलनी येथील 2 जणांचा मृत्यू झाला असून 9 रुग्ण आय सी यु मध्ये आहेत