श्रावणमास 20 जुलै पासून सुरु होत आहे.श्रावण मासानिमित्त मंदिरात आणि अन्य धार्मिक स्थळात धार्मिक कार्यक्रम करायचे असतील तर महानगरपालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे असे विना परवाना कार्यक्रम करता येणार नाहीत असे मनपा आयुक्त के एच जगदीश यांनी म्हटले आहे .
दैनंदिन पूजा अर्चा व्यतिरिक्त काही धार्मिक कार्यक्रम करायचे असतील तर महानगरपालिकेकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे.परवानगी न घेता मंदिरात ,मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केल्यास कोव्हिड19 अंतर्गत पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात येईल असे मनपा आयुक्त के.एच.जगदीश यांनी कळवले आहे.
जर श्रावणात कुणी परवानगी घेऊन जरी कार्यक्रम करत असतील तर शासनाने कोरून नियंत्रण करण्यासाठी जे नियम आणि मार्गदर्शक तत्वे दिली आहे त्याचे पालन देखील करणे गरजेचे आहे असेही मनपा आयुक्तांनी म्हटले आहे .
जर कुणी नियमाचा भंग करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे .