कर्नाटक राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे जनतेतून आणि विरोधी पक्षांच्या वतीने कोरिणाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने लॉकडाऊन लागू करण्याची मागणी करण्यात येत होती.सरकारकडून मात्र, सातत्त्याने राज्यात लॉकडाऊन होणार नाही अशी भूमिका मांडण्यात येत होती मात्र तज्ञ समितीच्या शिफारशीनुसार, वाढलेली कोरोना साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी पुन्हा एकदा लॉक डाऊन करण्याबाबत निर्णय घेतला आहे.
मंगळवार 14 जुलै रात्री आठ वाजल्यापासून बेंगळुरु शहर आणि ग्रामीण भागात एक आठवड्याचा लॉक डाऊन जारी केला आहे.14 जुलै ते 21 जुलै पर्यंत सात दिवस लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसां पासून राज्यात शनिवार आणि रविवारी लॉकडाऊन जारी करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.तज्ञ समितीच्या शिफारशीनुसार नवा लॉकडाऊन एक आठवड्याचा असेल. याबाबत सरकार कडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.बेंगळूरु शहर आणि ग्रामीण एक आठवड्याचा लॉकडाऊन जारी करणेबाबत वरिष्ठ स्तरावरील बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान कर्नाटक राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना राज्यात बेंगळुरुला नवा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता न्यूज पॉईंटने पाच जुलै रोजी व्यक्त केली होती.त्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे.
दरम्यान राज्यातील इतर जिल्ह्यात लॉक डाऊन करण्या बाबत स्थानिक डी सी निर्णय घेणार आहेत.