Sunday, December 22, 2024

/

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्मशानभूमीत करणार वाहनाचे पूजन’

 belgaum

देशात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता आमदार सतीश जारकीहोळी हे आपल्या नवीन वाहनाचे पूजन स्मशानभूमीत करणार आहे. याआधीही त्यानी स्मशानभूमीमध्ये वास्तव्य करून नागरिकांच्या मनातील भीती व अंधश्रद्धा दूर करण्याचे काम केले होते.

त्याच दृष्टिकोनातून आता सोमवार दिनांक 13 रोजी आपल्या नवीन वाहनाचे पूजन स्मशानभूमीत करणार आहेत.या अंधश्रद्धा निर्मूलन प्रयत्नाला नागरिक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात. सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत हे आपल्या वाहनाचे पूजन करणार आहेत. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांचे हे प्रयत्न वारंवार होतच आहेत.

सतीश जारकीहोळी यांनी यादीही सदाशिवनगर स्मशानभूमीत अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी वास्तव्य करून नागरिकांना त्या ठिकाणी जेवण आणि इतर सर्व भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आता ते आपल्या नवीन वाहनाचे पूजन देखील स्मशानभूमीत करणार आहेत. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांचे हे प्रयत्न यशस्वी ठरावीत अशी अपेक्षा अनेकांतून व्यक्त होत आहे.

सतीश जारकीहोळी हे मागील चार ते पाच वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वारंवार प्रयत्न करत आहेत. त्याच दृष्टिकोनातून आता आपल्या वाहनाचे पूजन स्मशानभूमीत करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी श्रद्धा ठेवावी अंधश्रद्धा नको असाच संदेश देणार आहेत.

कोरोना काळात सोशल डिस्टन्स अवलंब करत नेमक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून बेळगाव live च्या फेसबुक पेज वरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

आमदार सतीश जारकीहोळी करणार स्मशानभूमीत नवीन वाहनाचे उदघाटन -या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पहा फक्त बेळगाव Live वर

सोमवार 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पहा फक्त बेळगाव Live वर

#satishjarkiholi
#belgaumLive

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1152538981770360&id=375504746140458

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.