पालकमंत्री रमेश जारकिहोळी आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात रंगलेल्या कुक्कर वार बाबत यमकनमर्डीचे आमदार आणि माजी मंत्री सतीश जारकिहोळी यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.
गेल्या आठवड्या भरा पासून रमेश जारकिहोळी विरुद्ध लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला असून कुक्कर वाटपा वरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
बेळगाव शहरातील आर टी ओ सर्कल जवळील काँग्रेस भवनात माध्यमाना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की कुक्कर बंद किंवा चालू करायचं सगळं मिडियाकडेच आहे दोघांना घेऊन जाऊन तुम्हीचं शपथ घ्यायला लावा,बोलायला लावा सत्य बाहेर येईल ते कोल्हापूरला शपथ घ्यायला जातात की कुठं जातात माहीत नाही.
शपथ घेणे हा त्या दोघांचा विचार आहे त्या बाबत आम्ही दोघे काहीही बोलत नाही असे ते म्हणाले.
कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी राज्य आणि केंद्र दोन्ही सरकार अपयशी ठरली आहेत तीन महिने देखील नियंत्रण करणे सरकारला जमलं नाही.केंद्र आणि राज्य सरकार मध्ये समन्वय नाही कोरोना नियंत्रण करण्यात देखील भ्रष्टाचार झाला आहे आणि तो बाहेरही पडला आहे असे ते म्हणाले.
राज्य सरकारकडे हवे तेवढे पैसे आहेत ते खर्च केले तरी कोविड वर नियंत्रण येईल किमान तीनशे ते चारशे कोटी आहेत ते खर्च केले तरी लोक कल्यानाची कामे होतील असे म्हणाले