जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांनी कार्यशैली बदलली पाहिजे.पक्षासाठी पूर्णवेळ काम करणे आवश्यक आहे.कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पक्षाने योजना आखली आहे.काँग्रेस हा केडर बेस्ड पक्ष आहे असे उदगार केपीसीसी सरचिटणीस आमदार सतीश जारकीहोळी यांनी काढले.
केपीसीसी सरचिटणीसपदाची सूत्रे स्वीकारल्यावर बेळगावात प्रथमच दाखल झालेल्या सतीश जारकीहोळी यांचे पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोशी स्वागत केले.
भाजप अनेकदा खोटी माहिती पसरवत असतो.त्याला कसे तोंड द्यायचे याचे प्रशिक्षण कार्यकर्त्यांना दिले जाणार आहे.विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी झोकून देऊन कार्य करणे आवश्यक आहे.कार्यकर्ते कार्य कसे करतात याचे निरीक्षण केले जाणार आहे.प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य स्थान पक्षात दिले जाईल असेही जारकीहोळी म्हणाले.