बेळगाव शहरातील जैन समूह शिक्षण संस्थेच्या (जेजीआय) जैन पदवीपूर्व महाविद्यालयाच्या संजना उपाध्ये आणि दर्शन चिंडक यांनी बारावीच्या परीक्षेत अनुक्रमे 97.83 व 97.66 टक्के गुण संपादन करून वाणिज्य शाखेत बेळगाव जिल्ह्यात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
संजना उपाध्ये ही बारावी कॉमर्स मध्ये राज्यात 11 वी तर दर्शन चिंडक हा राज्यात बाराव्या स्थानी आहे.संजना उपाध्ये आणि दर्शन चिंडक व्यतिरिक्त जैन महाविद्यालयाच्या रितिका आनंदराव, खुशी कटारिया व नीला कित्तूर या विद्यार्थिनी प्रत्येकी 96.16 टक्के गुण संपादन करून विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदा जैन महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचे 83 विद्यार्थी विशेष गुणवत्तेत आणि 79 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेमधील साई जाधव ही विद्यार्थिनी 94.83 टक्के गुण घेऊन महाविद्यालयात प्रथम आली आहे. नवज्योतसिंग कोहली या विद्यार्थ्याने 94 टक्के गुण संपादन करून महाविद्यालयात दुसरा क्रमांक मिळवला आहे.
त्याचप्रमाणे सोनिया अष्टेकर व अपर्णा माहुळी यांनी प्रत्येकी 93 टक्के गुण मिळविले आहेत. जैन महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील 13 विद्यार्थी विशेष गुणवत्तेत तर 41 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
या सर्वांचे जैन पदवीपूर्व महाविद्यालयाच्या संचालक मंडळासह जेजीआय गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्य श्रद्धा कटवटे, महाविद्यालयाच्या प्राचार्य रोहिणी के. बी. आणि शिक्षकवर्गाने अभिनंदन केले आहे.