मागच्या निवडणुकीत दिलेले कुकर चांगले आहेत काय?हे कुक्कर मागच्या निवडणुकीत मी दिले होते.पण त्याचा मोठेपणा दुसऱ्यानी घेतला.कोणाचे तरी पैसे आणि कोणतरी मोठेपणा मारतोय अशी टीका बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे नाव न घेता टीका केली.
विजयनगर येथे भाजप ग्रामीण कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी रमेश जारकीहोळी बोलत होते.पुढील निवडणुकीत बेळगाव ग्रामीण मतदार संघात भाजपचा झेंडा फडकला पाहिजे.मागच्या निबडणुकीत माझ्यामुळे संजय पाटील यांच्यावर अन्याय झाला आहे.पुढच्या निवडणुकीत दुसरे कोण देतील त्याच्यापेक्षा मी दुप्पट पैसे देतो.आमचे पैसे घामाचे आहेत.पैसे नसले तरी कर्ज काढून देतो.
मागील निवडणुकीत माझ्या पैश्यानीच त्यांनी कुक्कर वाटले आहेत ते कुक्कर आता बरोबर आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.कार्यकर्त्यांनी सदैव कार्यरत राहायला पाहिजे.केवळ अंगडी किंवा रमेश जारकीहोळी काही करू शकत नाहीत.कार्यकर्त्यांनीच पुढे यायला पाहिजे असेही रमेश जारकीहोळी म्हणाले.
केवळ बेळगाव ग्रामीण विधानसभा नव्हे तर आगामी डी सी सी आणि जिल्हा पंचायत निवडणूक देखील जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यालय उद्घाटन प्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी,राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी आदी उपस्थित होते.