गेल्या 24 तासांत राज्यभरात तब्बल 5,324 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 27 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,01,465 इतकी झाली आहे. बेळगाव जिल्ह्याने आज 2 हजार बाधित रुग्णांचा टप्पा ओलांडला असून जिल्ह्यात आणखी 6 जणांचा मृत्यू झाला.
बेळगाव जिल्ह्यात आज सोमवारी नव्याने 155 रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2,304 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे आज आणखी 6 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या 52 झाली आहे. आज मयत झालेल्यांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असून हे सर्व सारी रुग्ण होते. त्याचप्रमाणे हे सर्व रुग्ण 55 ते 75 वर्षे वयोगटातील होते. जिल्ह्यात ॲक्टिव्ह केसेस 1,572 असून यापैकी 9 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. काल सायंकाळपासून आज दिवसभरात हॉस्पिटलमधून 38 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे जिल्ह्यात डिस्चार्ज मिळालेल्यांची एकूण संख्या 680 इतकी झाली आहे.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 26 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज सोमवार दि. 27 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 5,324 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 1 हजार 465 इतकी झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 61,819 असून यापैकी 598 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात आज सोमवारी 1,847 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 37,685 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 75 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 1,953 झाली असून यापैकी 8 जणांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.
कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आज सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पहिल्या पांच क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 1470 रुग्ण – एकूण रुग्ण 46923), बेळ्ळारी (840-4930), कलबुर्गी (631-4495), म्हैसूर (296-3163), उडपी (225-3612) आणि बेळगाव (155-2304).